Home > News Update > OBC RESERVATION : एकनाथ शिंदे सरकारची परीक्षा काय घडलं सर्वोच्च न्यायालयात?

OBC RESERVATION : एकनाथ शिंदे सरकारची परीक्षा काय घडलं सर्वोच्च न्यायालयात?

OBC RESERVATION : एकनाथ शिंदे सरकारची परीक्षा काय घडलं सर्वोच्च न्यायालयात?
X

ओबीसी आरक्षणासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी निवडणुका पुढं ढकलण्याची मागणी सॉलिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी केली. तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना या संदर्भात एक आयोग नेमण्यात आला आहे. मात्र, जो पर्यंत या आयोगाचा अहवाल पू्र्ण होत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश द्यावे, अशी भूमिका मांडली. यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाला आपली आपली भूमिका मांडावयाला सांगितले.

यावर निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया उद्यापासून सुरूवात होत असल्याचं सांगितलं. तसेच या निवडणूका एक आठवड्यापर्यंत पुढं ढकलू शकतो, अशी माहिती निवडणूक आयोगाने न्यायालयाने दिली. यावर न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी ठेवावी, असे सांगितलं.

यावर तुषार मेहता यांनी आक्षेप घेतला. यामुळं आरक्षण घेणाऱ्यांचे नुकसान होईल, त्यामुळं उद्या सुनावणी व्हावी, अशी मागणी केली. यावर न्यायालयाने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती थांबवता येणार नाही. मात्र, उद्यापासून अर्ज दाखल होणार आहेत. त्याला एक आठवडा मुदत वाढ देण्यात यावी, असं निरिक्षण नोंदवलं.

निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात नवीन आदेश जारी करावेत आणि आज दोन वाजता पुन्हा एकदा सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश दिले.

Updated : 12 July 2022 1:45 PM IST
Next Story
Share it
Top