NSA अजित डोभाल यांच्या RSS चा उल्लेख असलेल्या पत्राची सत्यता काय?
X
सोशल मीडियावर सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचं तथाकथिक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. या पत्रात कुंभ मेळ्याचं योग्य आयोजन केल्याबद्दल अधिकाऱ्यांची स्तुती करण्यात आली आहे. मात्र, हे पत्र बनावट असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
या पत्रात कोविड दरम्यान झालेल्या कुंभमेळ्याच्या आयोजनाबद्दल उत्तराखंड सरकारच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आलं आहे.
हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन. असा उल्लेख या पत्रात आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. हे पत्र बनावट आहे. सोशल मीडियावर प्रसारीत होणारं हे पत्र बनावट आहे.
काय म्हटलंय अधिकाऱ्यांनी
"हे पत्र बनावट आहे आणि एनएसएने असे कोणतेही पत्र लिहिले नाही." हे पत्र बनावट आहे.
पत्राचा मचकूर काय?
या 'बनावट पत्रात' अजित डोभाल यांनी उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना संबोधित करून कुंभमेळ्यातील परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. पत्रात शेवटी असे म्हटले आहे की, कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केल्यास देशात धार्मिक वातावरण निर्माण होईल, एक शिस्त निर्माण होईल आणि भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला चालना देण्याची संधी मिळेल.
भारतात ४ ठिकाणी कुंभ मेळ्याचे आयोजन केले जातं. नाशिक, हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन. यापैकी हरिद्वारमध्ये दर 12 वर्षांनी कुंभ मेळा आयोजित केला जातो. परंपरेनुसार कुंभ मेळा ४ महिने चालतो. मात्र, यावर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता १ महिन्याचा कालावधी ठरवण्यात आला होता.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी ट्विट करत
कुंभ मेळ्यातील काही वरिष्ठ साधूंसोबत चर्चा करून कुंभ मेळा प्रतीकात्मकपणे साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला साधूंनी पाठिंबा दिल्याने १ महिन्याचा अवधी ठरवण्यात आला आहे.