Home > News Update > विद्यापीठाला लागले भिकेचे डोहाळे ?

विद्यापीठाला लागले भिकेचे डोहाळे ?

विद्यापीठाला लागले भिकेचे डोहाळे ?
X

आता मोकळ्या हवेत व्यायाम करायचे पैसे मोजावे लागणार आहेत. होय, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात व्यायाम करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. विद्यापीठाने तसा आदेशच जारी केला आहे. विद्यापीठाच्या या आदेशाचा स्टुडंट हेल्पींग हँडचे, अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी घेतलेला समाचार

होय! साविञीबाई फुले विदयापीठाच्या आवारामध्ये आता सकाळी आणि संध्याकाळ जर व्यायामासाठी आलात तर पैसे मोजावे लागणार आहेत. तसा फतवाच कुलसचिवांनी काढला आहे. त्यांची तरी काय चुकी म्हणा, विद्यापीठाला भिकेचे डोहाळेच लागलेत ना. अशात करणार तरी काय ते ? त्यामुळे अशीच विद्यापीठाच्या कारभाऱ्यांच्या सुपीक डोक्यातुन आलेली ही कल्पना.

गेली कित्येक वर्ष सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष, स्पर्धा परीक्षार्थी आणी विदयार्थी विदयापीठ आवारात व्यायाम करण्यासाठी फिरत असतात. बरेच ज्येष्ठ नागरिकही येतात, काही वेगवेगळया आजारांनी त्रस्त असतात. धकाधकीच्या जीवनात आणि गजबजलेल्या पुण्यात खुली, आल्हाददायक व निवांत अशी जागा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने साहजिकच लोक विद्यापीठात येतात.

कुठे कधी या लोकांनी अनुचित प्रकार केला असे दिसले नाही. किंबहुना कधी तक्रारी देखील आलेल्या नाहीत, मग विद्यापीठाला अडचण काय ?

खरं म्हणजे विदयापीठाचा हा प्रकार दात कोरुन पोट भरण्यासारखाच म्हणावा लागेल. कारण आता उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झालेत आणि या योजनेतूनच कोटयावधीची रक्कम वसुल होणार असा यांचा गोड गैरसमज झालाय का?

विद्यापीठाचं डोकं ठिकाणावर आहे का ?

असे अजब निर्णय पाहून विदयापीठाचं डोकं ठिकाणावर आहे काय ? असा प्रश्न पडतोय. करोनाचे अभुतपुर्व संकट डोक्यावर असताना असताना कुठं हळुहळू लोक मोकळया हवेत दीडवर्षानंतर फिरायला, व्यायामाला बाहेर पडू लागलेत. अनेक महिन्यानंतर लोक मोकळा श्वास घेतायत, यालापण हे मंडळी निर्बंध घालत आहेत. अशी माणुसघाणी लोकं जोवर विदयापीठातून जात नाहीत ना तोपर्यत विद्यापीठाला येणार्‍या काळात हातात भिकेचा कटोराच घ्यावा लागणार हे नक्की.

असल्या गोष्टींनी पैसे कमवायला विद्यापीठ यांची खाजगी मालमत्ता आहे का? संघी व कर्मदरीद्री कुलगुरूंनी आता नाकर्तेपणाचा कळसच गाठलाय. भीक नको पण कुत्रा आवर अशी गत त्यांची झालीय. आधीच सकारात्मक असे काडीचेही काम करत नाही. मात्र, वारंवार असे वादग्रस्त पञक काढायला या कारभाऱ्यांच्या हाताला लकवा बरं बसत नाही ?

आधीच कोरोनामुळे अत्यंत त्रस्त झालेल्या जनतेची अशी लुट करणे म्हणजे मेलेल्याच्या टाळुवरचं लोणी खाण्या सारखेच आहे..जणाची नाही मनाची तरी ठेवावी...

कुलदीप आंबेकर

अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँड.

Updated : 12 Jun 2021 11:21 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top