Home > News Update > देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापुरातील भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापुरातील भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापुरातील भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्या दरम्यान कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यातच चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. "पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीमध्ये राजकारण नको. मी स्वत: आज शाहूपुरी येथे श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही परत एकदा सर्वाना बोलावून पुर परिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू. मी इथे आलो आहे तर प्रशासनही आमच्याबरोबर गुंतले आहे, माझी विनंती आहे की, कुणी आता पुरग्रस्त भागाचा दौरा करून प्रशासनाला अडकवून ठेवू नये." असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

एसडीआरएफचे मदतीचे निकष बदलण्याची मागणी

एनडीआरएफचे निकष २०१५ मधले आहेत. ते बदलण्याची गरज आहे अशी विनंती आम्ही केंद्राला केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. "मी वेड्यावाकड्या मागण्या केंद्राकडे करणार नाही. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही, तात्पुरती मदत तातडीने सुरू केली आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत पण घेऊ. विमा कंपन्यांना महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून किमान ५० टक्के विमा रक्कम देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती आपण केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांना केल्याचेही त्यांनी सांगितले. २०१९ मधल्या पुरामधील नुकसान भरपाईचा मोबदला आमचे सरकार सत्तेवर आल्यावर देणे सुरू झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगत फडणवीस यांना टोला लगावला.

पुराच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. पूर बाधित नागरिकांचं पुनर्वसन करण्यासाठी

आराखडा करणे गरजेचे आहे. पूर बाधित भागातील अतिक्रमणे काढणे आवश्यक आणि यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे पण चांगल्या सूचनांचे स्वागतही केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Updated : 30 July 2021 3:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top