Home > News Update > महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर न येता घरुनच घ्या दर्शन, सरकारचे अनुयायांना आवाहन

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर न येता घरुनच घ्या दर्शन, सरकारचे अनुयायांना आवाहन

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर न येता घरुनच घ्या दर्शन, सरकारचे अनुयायांना आवाहन
X

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे महापरिनिर्माण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या पदरी निराश पडली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या "ओमिक्रॉन" मुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. तसेच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायानी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. पण या कार्यक्रमासाठी ज्या व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच Thermal Screening नंतरच त्यांना आत सोडले जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागणार आहे.

तसेच ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी / शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत, तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान सरकारच्या या निर्बंधांना काही आंबेडकरी संघटनांनी विरोध केला आहे.

Updated : 30 Nov 2021 9:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top