प्रजासत्ताक दिन : ५५ वर्षात घडले नाही ते होणार !
X
प्रजासत्ताक दिनाला इतर देशांच्या प्रमुखांना भारतात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याची प्रथा आहे. पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनावरही कोरोनाचे सावट असल्याने यंदा इतर देशांच्या प्रमुखांना पाहुणे म्हणून न बोलवण्याचा निर्णय केंद्र सकारने घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना याआधी निमंत्रण देण्यात आले होते. पण ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने जॉन्सन यांनी भारतात येऊ शकत नसल्याचे पंतप्रधान मोदी यांना कळवले आहे.
त्यानंतर इतर कुणाला सरकार निमंत्रित करणार अशी चर्चा होती, पण कोरोनाची परिस्थिती पाहता परदेशी पाहुण्यांना न बोलावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेल्या ५५ वर्षात पहिल्यांदात असे होणार आहे की प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला परदेशा पाहुणे नसतील. दरम्यान २६ जानेवारीला दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. या रॅलीला मनाई करावी अशी मागणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली आहे. पण कोर्टाने यावर पोलिसांनी निर्णय घ्यावा असे सांगत सरकारच्या मागणीला महत्त्व दिले नाही. त्यामुळे २६ जानेवारीला दिल्लीत काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.