Home > News Update > विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी संदर्भात जबरदस्ती करू नका: शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी संदर्भात जबरदस्ती करू नका: शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी संदर्भात  जबरदस्ती करू नका: शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
X

कोरोना काळामध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू असताना सुद्धा राज्यातील अनेक शाळा संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी देण्यासंदर्भात दबाव आणण्यात येत आहे. अशा अनेक तक्रारी आल्या असल्यामुळे यासंदर्भात राज्य सरकार कठोर कारवाई करु असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने या वर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी संदर्भात कुठलीही जबरदस्ती करू नये तसेच त्यांना सवलत देण्यात यावा याकरिता राज्य सरकारने जीआर देखील काढला असला तरी, संस्थाचालकांकडून मात्र संदर्भात पालकांकडे दबाव टाकण्यात येत आहे.

या संदर्भात नाशिक येथील एका संस्थाचालक विरोधात पालकांकडून तक्रार आली असून या संदर्भात शिक्षण विभाग अशा प्रकारे कारवाई करण्यात येईल. या संदर्भात पाहणी करत असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.


Updated : 11 Dec 2020 4:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top