संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य निर्णय घेतला जाईल: शरद पवार
X
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत आणि हे आरोप एक महिलेने केले आहेत त्यामुळे हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेणार असल्याचे मी काल बोललो होतो. पण त्या आरोप केलेल्या महिलेच्या संबंधित ज्या गोष्टी पुढे आल्या त्यानंतर या प्रकरणाचे संबंध स्वरूप बदलले आहे.संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी भूमिका आज शरद पवार यांनी मांडली आहे.
आरोप केलेल्या महिलेच्या संबंधित ज्या गोष्टी पुढे आल्या त्यानंतर या प्रकरणाचे संबंध स्वरूप बदलले आहे. त्याच वास्तव स्वरूप पुढे येई पर्यंत आम्हाला थांबावे लागेल. संबंधित महिलेविरोधात वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी आरोप केले असून आता आम्हाला या सर्व प्रकरणाचा विचार करणे गरजेचे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरलं आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शरद पवार यांच्या प्रक्रियेनंतर पक्ष सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी चौकशी साठी एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने चौकशी करावी. या प्रकरणातील संपूर्ण सत्यात जाणून घेतली पाहिजे अस देखील पवार म्हणाले. मुंडे विरोधातील गुन्हा अजून दाखल झाला नसल्याबद्दल विचारलं असता, 'गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण भरोसा आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी खोलात जाण्याची गरज असते. यावर बोलण्याची आता काही गरज नसल्याचं पवार म्हणाले. नवाब मलिक यांच्या जावयाची याची चौकशी तसेच एकनाथ खडसे यांना समन्स याबाबत विचारलं असता, 'ज्याची सत्ता गेली, त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. ते नाराजी असणारच. ज्यांनी सत्ता मिळू दिली नाही, त्यांना लक्ष्य केलं जाणं यात मला काही फार आश्चर्य वाटत नाही. हा राजकारणाचा भाग आहे.' अशी टीका त्यांनी यावेळी केली.