सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचार केला नाही - प्रकाश आंबेडकर
X
दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचारच केला नाही, असा आरोप वंचित बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला आवाहन म्हणाले की तुम्ही जो पर्यंत स्वतःच बघणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणालेत की "अकोल्यात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चात मराठा समाजाचे आमदार होते का? असा सवालही आंबेडकरांनी केला आहे. तर ह्या मराठा समाजातील आमदारांनी गैरहजर राहून मराठा मोर्च्याकडे पाठ फिरवल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला आहे. मतदान मागताना जात दिसते, निवडून आल्यानंतर सोयिस्कर रित्या पक्षाने परवानगी दिली नाही, असे सांगितले जाते. म्हणून आपला वापर होतोय हे रयतेच्या मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही बोलून जनतेने सावध पवित्रा घ्यावा असे आंबेडकर म्हणाले आहेत.
अकोला शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर खोचक भाष्य करणारे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अकोला शहरातील पूल पडलाय त्यासंदर्भात महापालिका आयुक्त चौकशी का करत नाहीत, असा प्रश्न आंबेडकरांनी केला आहे. त्यातच अकोल्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक बेहाल आहेत. खराब रस्त्यांचे फोटो ट्विट करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, "आश्चर्यचकित होऊ नका. हा चांद्रयान 3 द्वारे काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो नसून अकोल्यातील रस्त्यांचा फोटो आहे. आता अकोल्यात चंद्र आणण्यासाठी कोण जबाबदार आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे!" असे खोचक भाष्य केले आहे.