Home > News Update > कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी गडकरींनी कायदा मोडला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी गडकरींनी कायदा मोडला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी गडकरींनी कायदा मोडला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
X

गडकरी त्यांचे विचार ज्या परखडपणे मांडतात. त्याच पद्धतीने ते त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजीही घेतात. त्यासाठी ते प्रसंगी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कायदाही मोडतात. गडकरी यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गंभीर आजारी असताना त्यांनी त्यांचा स्वीय सहाय्यकाचे प्राण कसे वाचवले. याचं उदाहरण एका कार्यक्रमात सांगितले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पाहा काय म्हणाले गडकरी? माझे प्रायव्हेट सेक्रेटरी जे नागपूरचं काम पाहतात. त्यांची तब्बेत अचानक खराब झाली. त्यांना विवेका रुग्णालयात भरती करण्यात आलं. ते नागपुरातील सर्वात चांगलं रुग्णालय आहे. मी भेट दिली असता डॉक्टरांनी जवळपास हात टेकले आणि "आम्ही हरलो" असं म्हंटले.

मी त्यांना उपाय विचारला असता. त्यांनी रुग्णाला मद्रास ( चेन्नई ) मधील एका एमजीएम रुग्णालयात दाखल करण्याची माहिती दिली. जिथे Heart Transplant होतं. तिकडे काही तरी होऊ शकतं. पण ते आयसीयू मध्ये ऑक्सिजन वर असल्याने त्यांना न्यायचं कसं हा प्रश्न समोर होता? त्यात डॉक्टरांनी हात टेकले.

मी घरी आल्यानंतर डिस्टर्ब होतो. कारण त्यांचे वडील माझ्या मोठ्या भावासारखे होते. त्यामुळे माझ्या परिवारातील एक व्यक्ती अशाप्रकारे असल्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता होती. मी लगेच एअर अॅम्बुलन्सची सोय करण्यास सांगितलं. एमजीएम रुग्णालयासोबत चर्चा केली. अमेरिकेवरून डॉक्टरशी चर्चा केली. मित्रांना कॉल केलं. पण त्यात अॅम्ब्युलन्सवाला म्हंटला मला ३५ लाख रुपये Advance पाहिजे. रात्री बँका बंद होत्या. पण माझी बायको एका को - ऑपेरेटीव्ह बँकेची अध्यक्ष आहे. मी लगेच बँकेच्या सीईओना फोन केला

आणि रात्री लॉकर उघडता येईल का? असं विचारलं मी तुला उद्याच्या उद्या पैसे परत करेल असं म्हटलं… ते पैसे त्या अॅम्ब्युलन्स वाल्याला दिले आणि त्याला पाच डॉक्टरांसहीत चेन्नईला नेलं. उपचार झाले आणि तो बरा झाला. बरा झाल्यानंतर माझाकडे भेटायला आला आणि लहानमुलांसारखा रडू लागला. आपल्या घरातला एक व्यक्ती मरणाला हात लावून परत आला. याचा मला मनस्वी आनंद होता. आयुष्यमध्ये केवळ सत्ता, संपत्ती असणं हेच महत्त्वाचं नसतं. सत्ता, संपत्ती ही केवळ माध्यमं आहेत. ही कधीच उद्दिष्ट असू शकत नाहीत. कारण मंत्रिपद किंवा किती सर्वोच्च सत्ता मिळाली. यातून काही समाधान मिळतं असं नाही. संपत्ती मिळवळी तर कलह निर्माण होतो आणि परीवार दुःखी होतो.

असं आपण अनेक लोकांच्या जीवनात पाहतो. जिथे गरिबी असते तिथे आनंद असतो आणि जिथे श्रीमंती असते तिथे अडचणी वाढतात. पण या सगळ्या परिस्थितीमधून आपण जेव्हा एका पारिवारिक भावनेतून सामाजिक दायित्वातून जेव्हा एकमेकांशी व्यवहार करतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये काम करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं असतं. "डोन्ट ब्रेक द लॉ बट बेट ब्रेक द लॉ अप टू द लास्ट लिमिट" . कायदा हा शेवटी जनतेकरिता आहे. गांधीजींनी सुद्धा सांगितलंय की "कायदा हा गरीब व शोषितांच्या हिताकरिता आहे. वेळ आलीच तर तो तोडावा.

Updated : 15 April 2021 4:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top