Home > News Update > अखेर नितेश राणेंना जामीन मंजुर

अखेर नितेश राणेंना जामीन मंजुर

अखेर नितेश राणेंना जामीन मंजुर
X

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान जिल्हा बँकेचे तात्कालिन अध्यक्ष सतीश सावंत यांचे सोशल मीडियाप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे गेल्या ७ दिवसांपासून अटकेत आहेत. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी नितेश राणे पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर दोन नितेश राणे यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर त्यानंतर झालेल्या सुनावणीत नितेश राणे यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र नितेश राणे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाल्याने त्यांना कोल्हापुर येथे रुग्णालयात हलवण्यात आले होते. तर त्यानंतर नितेश राणे यांच्या जामीनावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीनावर होणारी सुनावणी लांबली होती. मात्र बुधवारी अखेर नितेश राणे यांच्या जामीनावर सुनावणी झाल्याने नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे हा राज्य सरकारला मोठा धक्का मानला जातो. तर जामीन मिळाल्याने नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated : 9 Feb 2022 3:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top