Home > News Update > जिजाऊ संस्था घेणारं कोकणातील कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी: निलेश सांबरे यांचं मुख्यमंत्र्याना पत्र

जिजाऊ संस्था घेणारं कोकणातील कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी: निलेश सांबरे यांचं मुख्यमंत्र्याना पत्र

जिजाऊ संस्था घेणारं कोकणातील कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी: निलेश सांबरे यांचं मुख्यमंत्र्याना पत्र
X

राज्यासह कोकणात कोरोना महामारीने थैमान घातलेलं असून कोरोनाची लागण होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. यामध्ये काही मुलांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपल्याने ती अनाथ झाली आहेत. याच कोरोना काळात आईवडील गमावलेल्या कोकणातील पाच जिल्ह्यातील अनाथ मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने दाखवली आहे. या संदर्भात परवानगी मिळावी म्हणून या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील पाठवले आहे.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील पाचही जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतीक व आरोग्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या माध्यमातून या पाच ठिकाणी मोफत सीबीएससी शाळा, तसेच एक दृष्टीहिनाची शाळाही चालवली जात आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून एमपीएससी व युपीएससीचे वर्गही चालवले जातात.

यामुळे या पाचही जिल्ह्यातील अनाथ झालेल्या मुलांची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सक्षमपणे उचलू शकते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी पत्र लिहून ही जबाबदारी संस्थेकडे सोपवावी, अशी विनंती केली आहे.





Updated : 23 May 2021 12:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top