Home > News Update > निलेश राणेंनी मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवावी; सिंधुदुर्गच्या राजाजवळ कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे

निलेश राणेंनी मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवावी; सिंधुदुर्गच्या राजाजवळ कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे

निलेश राणेंनी मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवावी; सिंधुदुर्गच्या राजाजवळ कार्यकर्त्यांचे गाऱ्हाणे
X

मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असतो, तो पुन्हा चर्चेत आला आहे कारण आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंनी मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.सिंधुदुर्गच्या राजाजवळ कार्यकर्त्यांनी तसं गाऱ्हाणेच घातलं आहे.त्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

मालवणमध्ये आगामी निवडणूकांमध्ये कोणाची बाजी? वैभव नाईक गड राखणार की राणेंची सरशी होणार! हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

निलेश राणे या मतदारसंघातून निवडणूक लढवतात का? ते विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा पराभव करतात की पुन्हा एकदा वैभव नाईक बाजी मारतात हे पाहण्यासाठी 2024 च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे.

खरंतर हा मतदारसंघ याआधी नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र गेले दोन टर्म या मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक आमदार म्हणून निवडून येत आहेत. आगामी निवडणुकीत माजी खासदार निलेश राणेंनी विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Updated : 14 Sept 2021 7:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top