औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार- निलेश राणे
X
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच शरद पवार यांनी धार्मिक तणावाच्या घटनांवरून चिंता व्यक्त केली. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबाबत चिंता वाटावी, अशी स्थिती असल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी समाचार घेतला.
निलेश राणे यांनी ट्वीट करून शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला आहे. एवढंच नाही तर शरद पवार हे औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याचेही निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
निलेश राणे यांनी म्हटले की, निवडणूक जवळ आली की, पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असं म्हणत निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात,
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2023
कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. pic.twitter.com/1Rot33Ldct