Home > News Update > MaxMahrashtraImpact : News18 लोकमतला Pregnancy Tips भोवली, पीसीपीएनडीटीचा दणका

MaxMahrashtraImpact : News18 लोकमतला Pregnancy Tips भोवली, पीसीपीएनडीटीचा दणका

MaxMahrashtraImpact : News18 लोकमतला Pregnancy Tips भोवली, पीसीपीएनडीटीचा दणका
X

News 18 लोकमतच्या वेबसाईटवरील एका बातमी प्रकरणी PCPNDT पीसीपीएनडीटीने नोटीस बजावली आहे. या वेबसाईटवर 'Pregnancy Tips - मुलगा होण्याची लक्षणे नेमकी कोणती असतात?' अशी एक बातमी प्रसिद्ध कऱण्यात आली होती. पण या बातमीमुळे PCPNDT कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. या बातमीमुळे गर्भलिंग निदान करण्याबाबत जनसामान्यांमध्ये चुकीचे संकेत जाण्याची शक्यता असल्याचे या नोटिशीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे वेब पेजवर प्रसिद्ध झालेली ही बातमी त्वरित काढण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे.

न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीच्या अधिकृत वेब पेजवरून 14 जुलै रोजी Pregnancy Tips मुलगा होण्याची लक्षणे नेमकी कोणती असतात? अशा आशयाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्याने गर्भलिंग निदान करण्याबाबत जनसामान्यांमध्ये चुकीचे संकेत जाण्याची शक्यता असल्याचं म्हणत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी संबंधित वृत्तवाहिनीला नोटीस पाठवली होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम MaxMahrashtra ने प्रसिध्द केले होते.

डॉ. आशुतोष जपे यांच्या तक्रारीवरुन पीसीपीएनडीटी न्यूज 18 लोकमतच्या संपादकांना पाठवलेल्या नोटीस मध्ये नक्की काय म्हटलं आहे पाहूया.. "News 18 Lokmat या फेसबुक पेज व वृत वाहिनीच्या अधिकृत वेबपेजवर दि. १४.०७.२०२२ रोजी Pregnancy Tips मुलगा होण्याची लक्षणे नेमकी कोणती असतात? अश्या आशयाची बातमी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या बातमीमुळे आपण गरोदर मातेस मुलगा होणार की मुलगी याबाबत एक प्रकारे बेकायदेशीर मार्गदर्शन करत आहात, असे दिसून येत आहे. सदर बातमीचे छायाचित्र पत्रासोबत पाठवण्यात येत आहे. अशा प्रकरची बातमी प्रसिध्द केल्यामुळे गर्भलिंग निदान याबाबत जनसामान्यांमध्ये चुकीचे संकेत जाण्याची शक्यता आहे. तसेच PCPNDT ACT 1994 नुसार कायद्याचे उल्लंघन करीत आहात. तरी या बातमीच्या अनुषंगाने आपण सदर मजकुर आपल्या फेसबुक पेज व वेबपेज वरून तात्काळ काढावा. तसेच आपला खुलासा आयोगास त्वरीत सादर करावा."

News18 Lokmat न्युज चॅनलच्या दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या lokmat.news.१८.com/lifestyle/ या मुददयाखाली you-may-have-heard-about-the-symptoms- of-pregnancy-what-makes-a-boy-and-a-girl-७३१५९१.htm या अधिकृत वेबसाईटवर मुलगा किंवा मुलगी होण्याच्या काही लक्षणांचा अंदाज बांधण्यात आलेला आहे. ती खालीलप्रमाणे-

News18 Lokmat च्या बातमीमधे नेमके काय म्हटले होते..

योग्य कॅलरीज खाणे - ज्या महिला तुलनेने कमी कॅलरीज खातात, त्यांना मुलगी होते. ब्रिटिश संशोधनानुसार ७०० महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ज्या महिलांनी २४०० कॅलरीजचे सेवन केले, त्यांना मुलगा झाला. त्यांचे प्रमाण ६० टक्के होते, ज्या महिलांनी २०२० कॅलरीज खाल्ल्या त्यांना मुलगी झाली.........

नोकरी आणि तणाव ज्या महिला नोक-या करतात आणि त्यांना मानसिक ताण येत असेल तर त्यांना मुलगी होण्याची शक्यता जास्त असते, कारण एका अभ्यासत १६००० स्त्रीयांवर संशोधन करण्यात आल. त्यात असं आढळल की, ५५ टक्के स्त्रीयांनी मुलगी झाली, ज्या नोकरी करत असतात सतत तणावात होत्या. वडिलांच्या व्यवसाय किंवा नोकरी वरुनही मुलगा की मुलगी होणार, हे सांगता येत. ज्याचे वडील जास्त तणावात असतात. त्यांनी मुलगीच झालेली आहे. तर ज्यांचा हलकाफुलका व्यवसाय आहे, त्यांना मुले झालेली आढळून आलेली आहेत.

महिलेचे वजन महत्त्वाचे आहे- गर्भधारणेच्या वेळी ज्या महिलांचे वजन जास्त असते, त्यांना मुलगा झालेला आहे, असे एका संशोधनातून पुढे आलेले आहे. ज्यावेळी जेवण कमी जेवता त्यावेळी मुलगा होण्याची शक्यता कमी असते. कारण, नर गर्भ खूप नाजूक असतो. पण, मादी गर्भ तुलनेने मजबूत असतो. प्रतिकूल काळातही स्त्री गर्भ टिकून राहतो.

दाम्पत्याने एकत्र राहणे- गर्भधारणाच्या वेळी दोघेजण एकत्र राहिल्याने मुलगा होतो. असे एका संशोधनातून समोर आलेले आहे. युनायटेड स्टेटच्या संशोधकांनी सुमारे ९० हजार पालकांचा अभ्यास केला. त्यातील गर्भधारणेनंतर एकत्र राहणा-या ५१ टक्के जोडप्यांना मुलगा झाला, तर ४९ टक्के जोडप्यांना मुलगी झाली.

उन्हाळा आणि हिवाळा महत्त्वाचाआहे- गर्भधारणेनंतर मुलगा होणार की मुलगी हे उन्हाळा आणि हिवाळा या त्रुतुंवरही अवलंबून असते, असे एक संशोधन सांगते. हिवाळ्यामध्ये व्हायरल आणि बॅक्टेरियलचे प्रमाण जास्त असते. नर गर्भ नाजूक असल्याने तो हिवाळ्यात आईच्या संसर्गाचा सामना करायला सक्षम असतो. त्यामुळे उन्हाळयात गर्भ राहिला, तर मुलगा होण्याची शक्यता जास्त असते.

तरी आपण आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या लेखामुळे मुलगा होण्यासाठीचे जास्त प्रमाणात संकेत दिलेले असून सदरचे संकेत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम-२००३ मधील कलम २२ चा भंग होत असल्याचे आढळून येत आहे.

७ दिवसांच्या आत कथित उल्लंघन केल्याबद्दल PC&PNDT कायदा १९९४ अंतर्गत lokmat.news.१८.com विरुद्ध कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, याचे लेखी स्पष्टीकरण दयावे व सदर वेबसाईट वरील आक्षेपार्ह लिखाण त्वरीत काढून टाकण्यात यावे तसेच तुमचे लेखी स्पष्टीकरण या कार्यालयास वेळेत प्राप्त झाले नाही किंवा ते असमाधानकारक असल्यास, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम-२००३ मधील कलम २२ अन्वये कार्यवाही करणे भाग पडेल, याची नोंद घ्यावी, असे पीसीपीएवडीटे राज्य समुचित प्राधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांचे आदेश आहे.

Updated : 25 Nov 2022 1:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top