Home > News Update > Jacinda Ardern Resign : निवडणूकीआधी 'कार्यतत्पर पंतप्रधान' देणार राजीनामा

Jacinda Ardern Resign : निवडणूकीआधी 'कार्यतत्पर पंतप्रधान' देणार राजीनामा

नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी, दहशतवादी हल्ला अशा विविध समस्यांतून देशाला मार्ग दाखवणाऱ्या आणि कार्यतत्पर अशी ओळख असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली .

Jacinda Ardern Resign : निवडणूकीआधी कार्यतत्पर पंतप्रधान देणार राजीनामा
X

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (New zealand PM Jacinda Ardern) यांनी कोरोना (Covid 19) काळात केलेले काम, नैसर्गिक आपत्ती याबरोबरच दहशतवादी हल्ला या अनेक संकटांमध्ये धाडसाने पंतप्रधान पदाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे जेसिंडा आर्डन यांची कार्यतत्पर पंतप्रधान अशी जगभर ओळख निर्माण झाली होती. मात्र आर्डन यांनी आपण पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा गुरुवारी अचानक केली. त्यामुळे न्यूझीलंडसह जगभरातील नागरिकांना धक्का बसला आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान आर्डन यांनी वयाच्या 42 व्या वर्षी नेपियर मजूर (लेबर) पक्षाच्या (Labour Party) बैठकीत आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडमध्ये (New Zealand Election) सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यापुर्वी मी राजीनामा देत आहे. त्याचे कारण आम्ही निवडणूक जिंकू शकत नाही असं नाही. निवडणूका आम्ही जिंकणारच आणि आम्ही निवडणूक जिंकणार आहोत म्हणून मी राजीनामा देत आहे. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, असंही आर्डन यांनी जाहीर केलं.

मी एक माणूस आहे आणि मी पंतप्रधान म्हणून मला जे चांगलं करता आलं, ते सर्व केलं. आता पुढील चार वर्षे मी ही जबाबदारी पेलू शकत नाही. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे जेसिंडा आर्डन यांनी जाहीर केले. (New Zealand PM Jacinda Ardern resign)

Updated : 20 Jan 2023 8:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top