JEE MAINS 2024 च्या परीक्षेसंदर्भात आली नवीन अपडेट
X
JEE Mains 2024 अपडेट: (एनटीए) नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA कडून JEE Mains 2024 पेपर I परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लिप जारी करण्यात आली आहे.B.E./ B.Tch साठी परीक्षा शहर वाटपाची आगाऊ सुचना उमेदवारांना JEE च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://jeemain.nta.ac.in/
परीक्षार्थींच्या सोयीसाठी परीक्षा केंद्र जेथे असेल त्या शहराची आगाऊ सूचना दिली जाईल.JEE Mains परीक्षेची सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे फॉर्मचा अर्ज क्रमांक आणि तुमची जन्म तारीख माहित असणं आवश्यक आहे. B.Tech/ B.E किंवा पेपर I ची परीक्षा 27, 29, 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाईल. पेपर I परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे.