संजय राऊत म्हणतात 'ते' साडेतीन अती शहाणे कोण?
X
एंटीलिया केस आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेने NIA कडे मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर पु्न्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. सचिन वाझेने NIA ला एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठीस २ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. तसंच या पत्रात अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करून ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्याचे सांगितल्याचा आरोप या पत्रात केला आहे.
आज संजय राऊत यांनी सचिन वाझे ने अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपावर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली.जेल मधील पत्रलेखन हा संशोधनाचा तितकाच अभ्यासाचा विषय आहे. असे काही पत्रलेखक इतरांना देखील मिळू शकतात. एकंदरीत सर्व स्तरावर गलिच्छ राजकारणाने टोक गाठले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करण्याचे इतिहासातील हे सगळ्यात मोठे साडेतीन अती शहाण्यांचे कारस्थान दिसतेय. जय महाराष्ट्र असं ट्वीट केलं आहे.मात्र, आता महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करणारे साडेतीन अती शहाणे कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला आहे.