कोरोना नियंत्रणासाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन जारी
X
गेली वर्षभर जागतिक महामारी कोरोनाच्या नियंत्रणासाठी शासनपातळीवरुन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नव्या घोषणा करुन येत्या १ फेब्रुवारी पासून राबवण्याच्या नव्या सूचना जारी केल्या आहेत.
#COVID19 के खिलाफ़ लड़ाई को मज़बूती देने के लिए केंद्रीय गृह मंत्रालय ने Guidelines for Surveillance, Containment & Caution ज़ारी करी हैं।
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) January 27, 2021
ये दिशानिर्देश 1 फरवरी से 28 फरवरी 2021 तक प्रभावी रहेंगे ।https://t.co/dCbGSoukZB#Unite2FightCorona @PMOIndia @AmitShah pic.twitter.com/gbEIKWaXxn
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात एक ट्वीट केलं. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "#COVID19 च्या विरोधात लढाई आणखी मजबूत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही निर्बंध आणि खबरदारीचे उपाय जारी केले आहेत. या गाईडलाईन्स 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहतील"
काय आहेत नव्या गाईडलाईन्स?
- मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत आवश्यक
- चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, या नव्या गाईडलाईनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक क्षमतेनं चित्रपटगृह सुरु ठेवण्यास परवानगी
- चित्रपटगृहांसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालय लवकरच वेगळ्या गाईडलाईन्स जारी करणार
- स्विमिंग पूल सर्वांसाठी खुले करणात आले आहेत. याआधी स्विमिंग पूल केवळ खेळाडूंसाठी खुले करण्यात आले होते
- नव्या गाईडलाईन्समध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणार
- ये-जा करण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही
- कन्टेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक समारंभांना परवानगी - यासाठी गाईडलाईन्सचं पालन करणं आणि परवानगी घेणं आवश्यक असणार आहे.
- 65 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना सर्व उपयायोजनांचं पालन करण्याचा सल्ला
- आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहन
- देशात 1,76,498 लोकांवर उपचार : आरोग्य मंत्रालय
देशात गेल्या 20 दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनाची लागण झालेल्या नव्या रुग्णांहून अधिक आहे. तसेच देशात आता 1,76,498 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जे एकूण रुग्णांच्या 1.65 टक्के इतकं आहे. तर देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,03,59,305 इतकी झाली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे दररोज केवळ 69 कोरोना बाधित रुग्ण समोर येत आहेत. भारतात गेल्या सात दिवसांत 10 लाख लोकांमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.