न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना 'पद्मश्री' तर राजदत्त प्यारेलाल यांना 'पद्मभूषण
X
नवी दिल्ली : लोकप्रिय दिग्दर्शक राजदत्त यांना गुरुवारी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. याबरोबरच नागपुर मधील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला (कला क्षेत्र), भाजपचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक क्षेत्र), पद्मा सुब्रमण्यम (कला क्षेत्र), प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी (कला क्षेत्र), प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी (कला), तर बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे.
यासोबतच, होरमुसची एन. कामा (साहित्य, शिक्षण), न्या. एम. फातिमा बीवी (सार्वजनिक क्षेत्र), सीताराम जिंदाल (उद्योग), याँग लियू (उद्योग), अभिनेते मिथुन चक्रवर्ती (कला), अश्विन मेहता (औषध), सत्यव्रम मुखर्जी (सार्वजनिक क्षेत्र/मरणोत्तर), तेजस पटेल (औषधे), ओलांचेरी राजगोपाल (सार्वजनिक क्षेत्र), टोगदान रिम्पोचे (अध्यात्म/मरणोत्तर), माजी राज्यपाल नेते राम नाईक (सार्वजनिक क्षेत्र), संगीतकार प्यारेलाल शर्मा (कला), चंद्रेश्वर ठाकूर (औषध), उषा उथूप (कला), मरणोत्तर कुंदन व्यास (साहित्य), विजयकांत (कला), यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
विविध क्षेत्रांतील एकूण १३२ व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यात भारतातील पहिल्या महिला माहुत पार्बती बरुआ यांच्यासह चामी मूर्मू (सामाजिक कार्य), गुरविंदर सिंग (सामाजिक कार्य), जागेश्वर यादव (सामाजिक कार्य), संघटनकिमा (सामाजिक कार्य), हेमचंद्र मांझी (वैद्यकीय), सत्यनाथन बेलेरी (कृषी), के. चेल्लामल (कृषी), दुखू मांझी (सामाजिक कार्य), यामुंग जार्मोह लेगो (कृषी),