Home > News Update > #Melodi ट्रेंड ; पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पतंप्रधान जॉर्जिया यांच्या सेल्फीवर नेटकऱ्यांच्या कमेंट

#Melodi ट्रेंड ; पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पतंप्रधान जॉर्जिया यांच्या सेल्फीवर नेटकऱ्यांच्या कमेंट

पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी शेअर करताना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी काढलेली सेल्फी जोरदार चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi )आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni)"चांगले मित्र" असल्याचे कॅप्शन देत एक्स पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता सोशल मीडिया एक मनोरंजक हॅशटॅग (#Melodi) वापरण्यात आला आहे.

#Melodi ट्रेंड ; पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पतंप्रधान जॉर्जिया यांच्या सेल्फीवर नेटकऱ्यांच्या कमेंट
X

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सेल्फी मेलोनी यांनी आपल्या X हँडलवर शेअर करताना PM मेलोनी यांनी #Melodi हा हॅशटॅग वापरला आहे. त्याने कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, "COP28 चे चांगले मित्र." असं लिहीलं आहे. या सेल्फीमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.

हा सेल्फी पीएम मेलोनी यांनी शेअर करताच जोरदार व्हायरंल झाला आहे. यावर मोठ्या संख्येने सोशल मीडिया युजर्स कमेंट करत आहेत. दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट (COP28 समिट) च्या निमित्ताने इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.

भारत आणि इटली यांच्यातील सहयोगी प्रयत्नांची आशा - पंतप्रधान मोदी

यापूर्वी पीएम मोदींनी हँडलवर मेलोनीसोबतचा फोटो शेअर केला होता शाश्वत आणि समृद्ध भविष्यासाठी भारत आणि इटली यांच्यातील सहयोगी प्रयत्नांची अपेक्षा आहे.



COP28 शिखर परिषदेला उपस्थित राहून पंतप्रधान मोदी भारतात रवाना झाले आहेत. दिवसभरात पंतप्रधान मोदींनी जागतिक हवामान कृती शिखर परिषदेचे उद्घाटन सत्र, राज्य आणि सरकार प्रमुखांचे उच्चस्तरीय सत्र, COP28 मध्ये 'ट्रान्सफॉर्मिंग क्लायमेट फायनान्स' या विषयावरील सत्र आणि लीडआयटी (इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशनसाठी नेतृत्व) या कार्यक्रमाला संबोधित केले.


दरम्यान यावर अनेकांनी सोशल मीडियावर युजर्सने मनोरंजक कमेंट केल्या आहेत. "ये दोस्ती कुच अलग है" "चलो अब ऑफिशीअल अनाउंसमेंट करते है" अशा काहीशा मजेशीर कंमेट करण्यात आल्या आहेत














Updated : 2 Dec 2023 10:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top