Home > News Update > Neeraj Chopra : नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

Neeraj Chopra : नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

गोल्डनबॉय नीरज चोप्राने स्वित्झर्लंडमध्ये आणखी एक विक्रम करत नवा इतिहास रचला आहे.

Neeraj Chopra : नीरज चोप्राने रचला नवा इतिहास
X

कॉमनवेल्थ स्पर्धेत नीरज चोप्राला झालेल्या दुखापतीनंतर डायमंड लीग स्पर्धेत जोरदार पुनरागमन करत नीरजने नवा इतिहास रचला आहे.

ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने कॉमनवेल्थ स्पर्धेतही रौप्यपदकासह भारताची मान उंचावली होती. मात्र कॉमनवेल्थ स्पर्धेदरम्यान नीरज चोप्राच्या कंबरेला दुखापत झाली होती. मात्र या दुखापतीवर मात करीत नीरज चोप्राने स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेत जोरदार पुनरागमनासह विजेतेपद खेचून आणले आहे.

नीरज चोप्रा याने 89.8 मीटर भाला फेकत प्रथम स्थान पटकावले आहे. त्यामुळे नीरज चोप्राच्या नावावर आणखी एक विजेतेपद जमा झाले आहे.

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात रचला इतिहास

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.8 मीटर इतका भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्रा याने 85.18 मीटर भाला फेकला. मात्र नीरजने तिसरा प्रयत्न केला नाही. त्यानंतर नीरजचा चौथा प्रयत्न फाऊल झाला. तर नीरजने पाचवा प्रयत्न केलाच नाही. त्यामुळे नीरजने पहिल्याच फेकलेल्या 89.8 मीटर लांब भाल्याने थेट विजेतेपदाचा वेध घेतला.

Updated : 27 Aug 2022 10:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top