Home > News Update > ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची गरज, सरसंघचालकांचा इशारा

ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची गरज, सरसंघचालकांचा इशारा

ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याची गरज, सरसंघचालकांचा इशारा
X

नागपूरमध्ये विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला अनेक मुद्द्यांवर कान टोचले. बांगलादेशातील आणि जगभरातील हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर फोफावलेल्या अश्लिलतेविषयी चिंता व्यक्त केली.

बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदूंच्या स्थितीबाबत...

भागवत यांनी जोरदार आवाजात म्हटले की, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदूंच्या स्थितीबाबत भारताला काळजी घालणे आवश्यक आहे. त्यांनी सरकारला दुर्बलता सहन न करण्याचे आवाहन करत, समाजात वाढत असलेल्या अश्लिलतेवर प्रहार केला.

भागवत यांच्या मते, बांगलादेशात भारताबद्दलच्या नकारात्मक विचारांना बळ मिळवले जात आहे. भारतातील शत्रुत्व निर्माण करण्यासाठी बाह्य शक्तींनी योजने तयार केल्या आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांपासून ते माध्यमांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये विचारांची विकृती पसरवण्याचा आरोप केला.

दयानंद सरस्वती, अहिल्याबाई होळकर यांची आठवण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात ‘शस्त्र पूजन’ करून दसरा उत्सवाला सुरुवात केली. आरएसएस दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करते. यंदाही शस्त्र पूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भागवत यांनी संघ कार्यकर्त्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. हा दिवस संघ कार्यकर्त्यांसाठी विशेष असल्याचे म्हणत त्यांनी गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर परखडपणे भाष्य केले. कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अहिल्याबाई होळकर आणि दयानंद सरस्वती यांनी देशसेवेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. ‘अहिल्याबाई होळकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्य चालवले, त्यांनी स्वत:साठी काहीही न करता संपूर्ण देशात धर्म आणि संस्कृतीच्या उन्नतीसाठी ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा बांधल्या. ते एक आदर्श आहेत, या निमित्ताने त्यांची आठवण येते.’, असे भागवत म्हणाले तर पुढे ते असे म्हणाले, दुर्बलता हा अपराध असल्याचे आवाहन त्यांनी हिंदूंना केले. ही बाब हिंदूंनी लवकरात लवकर समजून घ्यावे दुर्बलता हिंदू समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी बांगलादेशातील हिंसक घटनावरून आणि हिंदूवरील वाढत्या हल्ल्यावरून सांगितले. त्यांनी सध्याच्या घडामोडीचा आढावा घेत धर्मांधतेवर आसूड ओढला आहे.

“समाजात सद्भावना राहण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे,”

त्यांनी समाजातील विविध जातींमधील एकता आणि समविचाराची गरज सांगितली. “समाजात सद्भावना राहण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. ओटीटीवरील अश्लिल कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले, यामुळे समाजात योग्य विचारांची मांडणी होईल. सरसंघचालकांनी आपल्या विचारांद्वारे स्पष्ट केले की, भारतात सामाजिक स्थिरता आणि सद्भावना राखण्यासाठी सक्रिय भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Updated : 12 Oct 2024 12:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top