राष्ट्रीय महिला आयोग आणि लव्ह जिहाद
राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एक ट्वीट ‘लव जिहाद’ संदर्भात ट्विट केलं. या ट्विटच्या माध्यमातून हिंदुत्ववादी कॉन्स्पिरसी थियरी असलेल्या 'लव जिहाद'ला एका संवैधानिक संस्थेने लेजिटीमसी देणं भयानक नाही का? यालाही न्यू नॉर्मल म्हणायचे? वाचा समीर शेख यांनी उपस्थित केलेला सवाल | #MaxMaharashtra
X
राष्ट्रीय महिला आयोगाने काल दुपारी केलेले हे ट्विट... यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना भेटून राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा केल्याचे लिहिले आहे.
ट्विटमधील पुढची ओळ अतिशय धोकादायक आहे. राज्यातील 'लव जिहाद'च्या वाढत्या केसेसवरही या भेटीत चर्चा झाल्याचे लिहिले आहे.
मुळात 'लव जिहाद' सारख्या अतिशय आक्षेपार्ह शब्दाचा उपयोग एक संवैधानिक संस्था कशी करू शकते? त्यातही महिला आयोग? मुळात 'लव जिहाद' ही टर्मच माहिलाविरोधी असताना (कारण या थियरीच्या मते हिंदू मुली बिनडोक असतात, कारण मुस्लिम मुले त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि मुलींचे धर्मपरिवर्तन करवतात) महिला आयोगाने तिचा वापर करावा हे दुर्दैवी असून त्याचा निषेध करायला हवा.
आजवर हिंदुत्ववादी कॉन्स्पिरसी थियरी असलेल्या 'लव जिहाद'ला एका casual tweet द्वारे एका संवैधानिक संस्थेने लेजिटीमसी देणे भयानक आहे. यालाही न्यू नॉर्मल म्हणायचे का?
सुज्ञ मंडळींनी, विशेषतः ज्यांच्या निर्णयक्षमतेवर आणि विवेकावर ही 'लव जिहाद' थियरी प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्या हिंदू मुलींनी आणि महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या या कृत्याचा निषेध करायला हवा.
राष्ट्रीय महिला आयोग आणि लव्ह जिहाद
- समीर