Home > News Update > लॉकडाऊन दरम्यान रस्ते अपघातात घट झाली का?

लॉकडाऊन दरम्यान रस्ते अपघातात घट झाली का?

लॉकडाऊन दरम्यान रस्ते अपघातात घट झाली का?
X

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या (NCRB Report) अहवालानुसार भारतातील रस्ते अपघात 2020 मध्ये 1.20 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, लॉकडाऊन दरम्यान दररोज सरासरी 328 लोकांचा रस्ते अपघातात जीव गेला आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, 3 वर्षात 3.92 लाख लोकांचा जीव गेला आहे.

2020 मध्ये 1.20 लाख, 2019 मध्ये 1.36 लाख आणि 2018 मध्ये 1.35 लाख लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी संपूर्ण देशात कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे लॉकडाऊन असतांना मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येते.

NCRB चा रिपोर्ट काय सांगतो?

हिट अँड रनची 1.35 लाख प्रकरणे...

रिपोर्टनुसार, 2018 पासून 'हिट अँड रन' अर्थात अपघातानंतर पळून जाणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. 2018 मध्ये 1.35 लाख गुन्हे या संदर्भात नोदवण्यात आले आहेत.

2020 मध्ये, हिट अँड रनची 41 हजार 196 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 2019 मध्ये 47,505 तर 2018 मध्ये 47,028 इतक्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

निष्काळजीपणामुळे झालेले अपघात...

रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण म्हणजे निष्काळजीपणा. निष्काळजीपणामुळे बहुतेक लोक रस्ते अपघातांना बळी पडतात. NCRB च्या रिपोर्टनुसार 2020 मध्ये सार्वजनिक रस्त्यांवर वेगाने आणि बेपर्वाईने वाहन चालवल्याने झालेल्या जखमींची संख्या 1.30 लाख होती. तर 2019 मध्ये हा आकडा 1.60 लाख होता. तर 2018 मध्ये 1.66 लाख लोक रस्ते अपघातात जखमी झाले आहेत.

या अहवालानुसार 2020 मध्ये 85,920 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर 2019 मध्ये 1.12 लाख आणि 2018 मध्ये 1.08 लाख लोक जखमी झाले आहेत.

रेल्वे अपघातात मृतांची संख्या...

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, 2020 मध्ये देशभरात रेल्वे अपघातांमध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यूच्या 52 प्रकरणांची नोंद झाली आहे. यापूर्वी 2019 मध्ये हा आकडा 55 होता. तर 2018 मध्ये रेल्वे अपघातांमध्ये 35 लोकांचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची नोंद होती.

वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू...

NCRB ने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये देशात वैद्यकीय निष्काळजीपणामुळे 133 मृत्यूची नोंद झाली आहे. 2019 मध्ये हा आकडा 201 होता. तर 2018 मध्ये 218 लोकांनी वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आपला जीव गमावला होता.

लॉकडाऊन दरम्यान दुर्घटना...

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार 25 मार्च 2020 ते 31 मे 2020 दरम्यान देशभरात संपूर्ण लॉकडाऊन असताना अपघातांची संख्या कमी झालेली नाही. लॉकडाऊन दरम्यान, 2020 मध्ये, रस्ते अपघातांमध्ये 1.20 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं अहवालानुसार स्पष्ट होते.

Updated : 21 Sept 2021 9:35 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top