Home > News Update > खतांच्या किंमती वाढल्या, राष्ट्रवादी करणार केंद्राच्या विरोधात आंदोलन

खतांच्या किंमती वाढल्या, राष्ट्रवादी करणार केंद्राच्या विरोधात आंदोलन

खतांच्या किंमती वाढल्या, राष्ट्रवादी करणार केंद्राच्या विरोधात आंदोलन
X

पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधाता राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत ७१५ ने वाढली आहे. डीएफए जी अगोदर ११८५ रुपये किंमत होती ती आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ ऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.


देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं पाप केंद्रातील भाजप सरकारने केलं आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हयात शेतकऱ्यांवर वेगळया प्रकारचा बोजा लादला असून केंद्राने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

Updated : 16 May 2021 4:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top