दरोडेखोर एकदाच दरोडा टाकतो.. इथं चित्र वेगळ : जयंत पाटलांचा केंद्रीय तपास संस्थांना टोला
X
केंद्र सरकार विरोधात बोललं तर पाहुणे घरी येतात, आमचे नवाब मलिक रोज या पाहुण्यांची वाट पाहत आहेत. आपण सरकारविरोधात बोललो नाही तर पाहुणे दुर्लक्ष करतात एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून ते काम करतात का? असा संशय येतो. अनिल देशमुख यांच्या घरी सात वेळा या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. निदान दरोडेखोर तरी एकदाच दरोडा टाकता मात्र इथं चित्र वेगळंच असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यावेळी तपास यंत्रणांना लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील नेहरू सेंटरला कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील पाटील म्हणाले, देशाचा सर्वोच्च लष्करी प्रमुखाचं हेलिकॉप्टर कोसळतं. म्हणजे तुमच्या संरक्षण व्यवस्थेत त्रुटी आहे. 'देशाच्या संरक्षण प्रमुखांचं हेलिकॉप्टर कोसळतं; ही संरक्षण यंत्रणेवर संशय व्यक्त करणारी घटना' असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच लखीमपूर घटनेमध्ये 6 दिवस मंत्र्यांच्या मुलाला अटक केली नाही, अजून मंत्र्यांचा राजीनामा घेतला शिवाय भारताच्या संरक्षण प्रमुखांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळतं ही घटना धक्कादायक असून संरक्षण यंत्रणेवर ही घटना संशय व्यक्त करणारी आहे. चौकशीत काय समोर येतेय हे पाहावे लागेल असं त्यांनी सांगितलं.मराठा आणि ओबीसी आणि मुस्लिम आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या निर्णयांना कोर्टात जावून अडवण्याचे धोरण काही लोकांनी घेतल्याचं त्यांनी टीका केली.