Home > Election 2020 > राष्ट्रवादीला पुणे जिल्हयात धक्का, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भाजपामध्ये

राष्ट्रवादीला पुणे जिल्हयात धक्का, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भाजपामध्ये

राष्ट्रवादीला पुणे जिल्हयात धक्का, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष भाजपामध्ये
X

पुणे जिल्ह्यातील शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे बंडखोर उमेदवार पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे निष्ठावंत म्हणुन प्रदीप कंद यांना पक्षाने पुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व अध्यक्ष पद दिले होते.

प्रंदीप कंद 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडुन विधानसभेसाठी इच्छुक होते. दोन्ही वेळा पक्षाने उमेदवारी न दिल्याने यावेळी प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रदीप कंद यांनी अचानक विधानसभा निवडणुकीतुन माघार घेतली. त्यांनतर दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रदीप कंद यांनी आपण भारतीय जनता पक्षाबरोबर काम करणार असल्याचं जाहीर केले.

प्रदिप कंद यांनी दोन वेळा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडे तिकीट मागितले होते.

दोन्ही वेळा माजी आमदार अशोक पवार यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने उमेदवारी दिल्याने प्रदीप कंद समर्थक नाराज झाले होते. समर्थक कार्यकर्त्यांंच्या दबावामुळे भाजपात प्रवेश करणार असल्याचं कंद यांनी जाहीर केले. भाजपाचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारात प्रदीप कंद सहभागी होणार आहेत. कंद यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

Updated : 8 Oct 2019 5:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top