पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे; राजकीय नेत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया
X
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर वाद सुरू होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. तसेच पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार(Sharad Pawar ) यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रीया
आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत! यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. दरम्यानं सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रीयेवर प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले की " आम्ही सर्व मराठी आहोत त्यांमुळे पक्ष पळवाचा प्रश्न येतो कुठे ? असा सवालं उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की "लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. ज्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांना मेरीटवर निवडणूक ओयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. अजित पवार यांना शुभेच्छा देतो. शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्ह हे देखील आम्हाला निवडणूक आयोगानी मेरीटवरचं दिलं देशात बहुमताला महत्व आहे. त्यामुळे जो निर्णय अजित पवार यांच्यासोबत झाला आहे. तो बहुमताने झालेला आहे." अशी प्रतिक्रीया शिंदे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत म्हणाले की "आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो". अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
देशाची लोकशी संपली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रीया
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की "ज्यावेळी शिंदे गटाला शिवसेना बहाल करण्यात आली, त्यावेळीच आम्हाला आजचा निकाल अपेक्षित होता. यामध्ये नवीन काही नाही. देशातील लोकशाही संपली आहे. कायदा सुव्यवस्था काही नाही, सत्ताधारी म्हणतील त्या पद्धतीने सर्व एजन्सी काम करत आहे. कुणाचाही पक्ष थोडा काढा, हिसकावून घ्या आणि कुणालाही देऊन टाका. हे सगळं काही देशातील संविधान लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम चाललंय. आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जाईल." अशी प्रतिक्रीया
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निर्णयावर टिका
दरम्यान यावर प्रतिक्रीया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की "शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे झाले. अदृश्य शक्तीचे मराठी माणसाच्या विरोधातले षडयंत्र आहे. मला निकालाचं आश्चर्य वाटत नाही. हा निकाल अपेक्षित होता. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठे षडयंत्र आहे. वडिलांच्या नावावर घर असेल तर वडिलांना घरातून बाहेर काढणार आहे का? असा सवाल यावेळी सुळे यांनी उपस्थित केला. आम्ही याविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार आहोत अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. साहेबांचा पक्ष दुसऱ्याने ओरबाडून नेला आहेपण कुठेही जा राष्ट्रवादी म्हटलं की साहेबांचचं नाव समोर येईल" असही सुळे यावेळी म्हणाल्या म्हणाल्या आहेत.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रीया
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एक्स पोस्ट करत प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की " शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब.
याच नावासाठी लढत होतो, याच नावासाठी लढतोय,आणि याच नावासाठी लढत राहणार..!" असं एक्स पोस्ट आव्हाड यांनी केली आहे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रीया
सुषमा अंधारे म्हणाल्या की " स्वायत यंत्रणा या सत्ताधारी कच्छेपी लागल्या आहेत. तीथे असे निर्णय फार अपेक्षित असतात. मात्र, कोणाला तरी नाव पक्ष दिलं म्हणजे तो पक्ष त्यांचा होतं नाही. कारण अधिष्ठांण फार महत्वाचं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांच अस्थित्व हे निवडणूक आयोगाच्या निकालावर नाही. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आजही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत" असल्याची प्रतिक्रीया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.