राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कोरोना वॉरियर्ससोबत केले रक्षाबंधन साजरे
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कोरोना योद्धयांसोबत रक्षाबंधन साजरे केले,कोरोना काळात ज्यांनी रक्षा केली त्यांचा आज खा. सुळे यांनी सन्मान केला.
X
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कोरोना योद्धयांसोबत रक्षाबंधन साजरे केले,कोरोना काळात ज्यांनी रक्षा केली त्यांचा आज खा. सुळे यांनी सन्मान केला.सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणिव आरोग्यमंत्री राजेश टोपे कायम सांगतात कोरोना नियम पाळा, त्यानुसार जनतेने कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे असं सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजपच्या जनआशीर्वाद यात्राबाबत संजय राऊत आणि मुख्यमंत्री बोलले आहेत, केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारी पाळली पाहिजे, भाजपच्या लोकांनी याबाबत विचार केला पाहिजे,गर्दी टाळायला पाहिजे असं त्या म्हणाल्या.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना 'आपण जेव्हा सत्तेत असतो विरोधकांनी टीका करणं साहजिक आहे, त्यांनी टीका करत राहो, आम्ही सेवा करत राहणार, त्यांचा यामागचा उद्देश काय आहे, हे त्यांनाच विचारा, आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाही, ते बोलले म्हणजे सत्य होत नाही', असं सुळे यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सोबतच त्यांनी कुणाशी युती करावी, हा त्यांचा प्रश्न आहे,माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत अस देखील त्यांनी म्हटले आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याशी मी बोलले आहे, मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, महिलेचा विषय आहे,संवेदनशीलपणे हा विषय हाताळला पाहिजे शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.दरम्यान आमदार संजय राठोडा यांना मिळालेल्या क्लिन चिट बाबत पत्रकारांनी विचारले असता मला या विषयाची माहिती नाही, मात्र याबाबत मी गृहमंत्र्यांच्या कानावर हा विषय टाकेन असं सुळे यांनी म्हटले आहे.