Home > News Update > 'त्या' व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मागीतली माफी, आमदार नवघरेंना रडू कोसळले

'त्या' व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मागीतली माफी, आमदार नवघरेंना रडू कोसळले

त्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मागीतली माफी, आमदार नवघरेंना रडू कोसळले
X

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना सर्वांच्या विनंतीनुसार अनावधानाने अश्वारूढ पुतळ्याच्या अश्वावर चढल्या गेलो. अनावधानाने झालेली ही चूक आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांचा नितांत आदर आहे व त्यांच्यावर निस्सीम प्रेम आहे. अनावधानाने झालेल्या या प्रकाराबद्दल मी जाहीर माफी मागतो, अशी स्पष्टोक्ती हिंगोलीतील वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी दिली आहे.

वसमत शहरामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा स्थापनेनिमित्त जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. शहरामध्ये महाराजांच्या पुतळ्याचे आगमन होताच सर्वपक्षीय नेते मंडळींच्या वतीने या भागाचे आमदार या नात्याने वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची संधी दिली गेली. आनंदाच्या भरात सर्वांच्या विनंतीनुसार आमदार नवघरे हे अभिवादन करण्यास गेले. यावेळी अनावधानाने ते पुतळ्यावर चढवून बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.या घटनेबद्दल आमदार नवघरे यांनी आता स्पष्टीकरण दिले असून, माध्यमांशी बोलताना भावनिक झालेल्या आमदार नवघरे यांना आपले अश्रू आवरता आले नाही आणि आमदार नवघरे यांना अक्षरशः रडू कोसळले.




अनावधानाने झालेल्या या प्रकाराबद्दल आमदार नवघरे यांनी माफी देखील मागितली आहे. मी एक सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता असून माझ्या विरोधात अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल विरोधक मला टार्गेट करत असल्याचे देखील ते म्हणाले.

Updated : 13 Oct 2021 8:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top