Home > News Update > राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.

ऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भालके यांना रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

कालपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे.

Updated : 28 Nov 2020 9:50 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top