Home > News Update > Maharashta Politics : शरद पवार पुन्हा मैदानात

Maharashta Politics : शरद पवार पुन्हा मैदानात

राष्ट्रवादीचे नेते विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतही दोन गट पडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

Maharashta Politics : शरद पवार पुन्हा मैदानात
X

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडत दोन गट स्थापन झाले आहेत . अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मोठ्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबतच (MVA)असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवार यांनी 8 नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार(Sharad Pawar) हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं. आज ते पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण (Yashawant Chavan) यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे नवे प्रतोद आणि विरोधी पक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती होताच जितेंद्र आव्हाड यांनी कामाला सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रात्री एक वाजता स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शासकीय निवास्थानी जाऊन पक्षाचा अधिकृत व्हीप पोहोच केला आहे.

अजित पवारांचा राष्ट्रवादीवर दावा करण्यात आला आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी सगळे आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच आपण राष्ट्रवादी म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय आपण आगामी निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत घड्याळ या चिन्हावरच लढवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

Updated : 3 July 2023 11:10 AM IST
Next Story
Share it
Top