Home > News Update > ST workers protest: भाजपचे नेते आंदोलना पुढे जाऊन दंगा करत आहेत: जयंत पाटील

ST workers protest: भाजपचे नेते आंदोलना पुढे जाऊन दंगा करत आहेत: जयंत पाटील

ST workers protest: भाजपचे नेते आंदोलना पुढे जाऊन दंगा करत आहेत: जयंत पाटील
X

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे. तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा. अशा मागण्या करत आहे.

मात्र, सरकारने यासाठी तीन आठवड्याचा कालावधी मागितला आहे. आजपर्यंत 37 आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळं सरकारने तात्काळ यावर निर्णय घेण्याची मागणी केली जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आपलं मत व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत. दंगा करत आहेत. अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्यसरकारची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही. दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत. अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

Updated : 12 Nov 2021 5:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top