Home > News Update > देशभरातून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस : सोशल मिडीयातून केले आभार व्यक्त

देशभरातून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस : सोशल मिडीयातून केले आभार व्यक्त

अचानकपणे काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती केल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, तपासणीनंतर निदान झाल्यानंतर, त्यांच्या पित्ताशयामध्ये एक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. यामुळे देशभरातून त्यांच्या तब्बेतीबद्दल विचारणा होत असताना शरद पवारांनी आता सोशल मिडीयावरुन सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

देशभरातून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस : सोशल मिडीयातून केले आभार व्यक्त
X

खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वडिल शरद पवार यांचे पुढील 15 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर, देशभरातून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस होत असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर कुठलीही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. एन्डोस्कोपीनंतर त्यांच्यावरआवश्यक त्या सर्जरी करण्यात येतील.

तोपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर, सुप्रिया सुळे यांनीही व्हॉट्सअप स्टेट्सद्वारे माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या प्रकृती समजताच सोशल मीडियातून त्यांच्यावर उत्तम प्रकृतीसाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

राजकीय नेत्यांकडूनही शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात संबंधितांना विचारण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार! असे पवार यांनी म्हटले. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही शरद पवार यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली आहे.



Updated : 29 March 2021 3:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top