NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर ठेवली जातं आहे पोलिसांकडूनच पाळत? वानखेडेंची तक्रार
X
आर्यन खान प्रकरणानंतर माध्यमांमध्ये सातत्याने चर्चेत असणारे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मुंबई पोलीस विभागामधील अधिकारीच आपल्या हालचाली पाळत ठेवत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडे आपल्या इतर अधिकाऱ्यांबरोबर मुंबई पोलिसांच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज भेटले आणि त्यांनी तक्रार ही दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, "मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांमधील काही कर्मचारी आपल्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत" अशी तक्रार करत यासंदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज देखील वानखेडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाकडे सुपूर्द केले आहे. यामध्ये २ पोलीस कर्मचारी साध्या कपड्यांमध्ये वानखेडे यांचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपण नेमके कुठे जातो, कोणाला भेटत आहोत? हे टिपत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच वानखेडेच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून वानखेडे नेहमी स्मशानभूमीला भेट देतात.
ओशिवरा पोलिसांचे २ पोलिस त्या स्मशानात गेले, जेथे त्यांनी वानखेडेच्या हालचालीचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज घेतले आहेत असा आरोप त्यांनी केला. दरम्यान आर्यन खान प्रकरनावरून मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर ही कारवाई बनावट असल्याचे गंभीर आरोप केला होता. एनसीबीच्या कारवाई वेळी त्या ठिकाणी भाजपचे काही नेते देखील आढळून आल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर सतत आरोप होत असल्यामुळे आपल्यावर नजर ठेवली जात असल्याचा संशय समीर वानखेडे यांनी व्यक्त करत याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.