Home > News Update > भारती सिंह प्रकरणी एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

भारती सिंह प्रकरणी एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

भारतीय जनता पार्टी यंत्रणांचा कसा गैरपापर करुन घेते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सुशांत सिंग प्रकरणातील ड्रग कनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्ती एक महीना आणि शौविक चक्रवर्तीला तीन महीने कोठडीत ठेवल्यानंतर भाजपची जवळीक असलेल्या कॉमेडीयन भारती सिंहला एनसीबी अधिकाऱ्यांनी मदत करुन जामीन मिळवून दिल्याचं उघड झालं आहे.

भारती सिंह प्रकरणी एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित
X

अंमली पदार्थ विरोधी पथक सध्या बॉलिवूड ड्रग्ज माफियांवर करडी नजर ठेवून आहे. परिणामी गेल्या काही काळात ड्रग्ज प्रकरणी सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित बॉलिवूड कलाकारांची नाव समोर आली. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे कुठलीही कारवाई होण्यापूर्वीच हे कलाकार कायद्याच्या तावडीतून सुटले. दरम्यान त्यांच्या या सुटकेसाठी एनसीबीमधीलच काही अधिकाऱ्यांनी मदत केली अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. शिवाय या प्रकरणी एनसीबीमधील दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आलं आहे.

भारती सिंहच्या याचिकेवर जेव्हा सुनावणी सुरु होती. तेव्हा एनसीबीचे अधिकारी कोर्टात उपस्थित नव्हते. त्यामुळे एनसीबीची बाजू कोर्टात मांडलीच गेली नाही. परिणामी कुठल्याही विरोधाअभावी भारती आणि तिच्या पतीला जामिन मिळाला. असाच काहीसा प्रकार इतर कलाकारांच्या बाबतीतही घडला होता. यासाठी अधिकाऱ्यांच्याच टीममधील दोन जणांनी मदत केली असा संशय आहे. या संशयाच्या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. सध्या या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरु आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर २३ नोव्हेंबर रोजी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला 'एनपीडीएस' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

त्यानंतर या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. जो मंजूर करण्यात आला असून दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे. एका बाजूला भारती सिंहला ताबडतोब जामीन मिळत असताना सुशांत सिंग प्रकरणातील ड्रग कनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्ती एक महीना आणि शौविक चक्रवर्तीला तीन महीने कोठडीत ठेवल्यानंतर जामीन मिळाला होता. एनसीबी अधिकाऱ्यांची मदत आणि भाजप कनेक्शन जामीनासाठी कारणीभुत असल्याची आता चर्चा आहे.

Updated : 4 Dec 2020 9:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top