नवाब मलिक यांची ED कडून चौकशी, अमोल कोल्हेंचे ट्वीट व्हायरल
X
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. बुधवारी पहाटे ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले, त्यावरच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल सुरु केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं असून हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे. अमोल कोल्हे यांनी या ट्वीट मधून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते आपल्या ट्वीट मधून म्हणतात…
सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा...
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी
अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला आहे.
सत्तेच्या माडीसाठी
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2022
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा...
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी#WeStandWithNawabMalik pic.twitter.com/kaw7AfG8Xj
त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटरच्या माध्यमातुन ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे.
ईडी ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
ईडी ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. MVA ची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 23, 2022
हा महाराष्ट्राचा अपमान आहे.नवाब मलिकांना नोटीस न देता ईडी चौकशीसाठी नेत आहे.हा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग आहे. अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.