नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये- संजय राऊत
नवाब मलिक यांना अटक झाली असली तरी त्यांचा राजीनामा घेऊ नये, संजय राऊत यांचा महाविकास आघाडी सरकारला सल्ला.
X
राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या अटकेवर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवर प्रतिक्रीया व्यक्त करताना नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, असा सल्ला महाविकास आघाडीला दिला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करून नवाब मलिक यांच्या अटकेवर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. यामध्ये संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीशी समोरा-समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत. चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊ द्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावणसुध्दा मारले गेले. हेच हिंदुत्व आहे, जय महाराष्ट्र, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.
महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2022
कंस आणि रावण सुध्दा मारले गेले...हेच हिंदुत्व आहे..
जय महाराष्ट्र!
भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर भाजपला समोरा-समोर लढता येत नसल्याने अफजलखानी वार सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ नवाब मलिक यांना अटक केल्याने भाजपच्या नेत्यांना आनंदाचे भरते आल्याचे म्हटले आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.