नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
X
ED ची पिडा मागे लागलेले महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते नवाब मलिक यांची विशेष पीएमएलए कोर्टाने न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिल पर्यंत वाढ केली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार नवाब मलिक यांना बिछाना आणि खुर्ची उपलब्ध करून दिली जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांना घरचं जेवण आणि औषधी घेण्यासही न्यायालयाकडून परवानगी दिली गेली आहे.
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे.
ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे. ED कडून झालेल्या अटकेच्या विरोधात नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर लवकरच सुनावणी होणार आहे.