कार भाड्याने घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
X
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी केले एका ठकाला जेरबंद केले आहे, जो रॉयल कार सेल्फ ड्राईव्ह नावाची बोगस कंपनी स्थापन करून, गाड्या भाड्याने घेऊन, गाडी मालकांना सुरवातीच्या तीन महिने भाडे देऊन,नंतर गाडी गहाण टाकून फसवणूक करत होता. या ठकाला नवी मुंबईच्या झोन एकने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. संबंधित आरोपी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होता,मात्र त्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संबंधित आरोपी हा ड्राईव्ह इजी कंपनीत काम करत असल्याने त्याला ह्याचा अनुभव होता, मात्र कोरोनामुळे व्यवसाय कमी झालेल्या कंपनीतून आरोपी संदीप रघु शेट्टी ह्याला काढून टाकण्यात आले होते. त्याच कंपनीत मॅनेजर असलेल्या इम्रान बेग यांनी केलेल्या तक्रारी वरून आरोपीला सापला रचून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी कडून विविध कंपनीच्या 23 कार असा एकूण 72 लाख 90 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.