Home > News Update > "आम्हाला फक्त हाऊस किपिंगचे काम देणार का?", मेट्रो प्रकल्पग्रस्तांचा सवाल

"आम्हाला फक्त हाऊस किपिंगचे काम देणार का?", मेट्रो प्रकल्पग्रस्तांचा सवाल

आम्हाला फक्त हाऊस किपिंगचे काम देणार का?, मेट्रो प्रकल्पग्रस्तांचा सवाल
X

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून येत्या 5 महिन्यात प्रत्यक्षात मेट्रो धावणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली त्या बदल्यात तुटपुंजा मोबदला मिळाल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांची मुख्य मागणी ही नोकरीची आहे. प्रकल्प पूर्ण झाल्याने काही ठिकाणी महामेट्रोने नोकर भरती केली आहेत, पण यात एकाही प्रकल्पग्रस्तांला घेण्यात आलेले नाही, असा आरोप या प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

इथे इतरांना पैसे घेऊन नोकरीत घेतले जाते आहे, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. केवळ हाऊसकिपिंगच्या जागांवर भूमिपुत्रांना आणि प्रकल्पग्रस्तांना घेतले जाते, पण कौशल्याधारीत कामांसाठी प्रकल्पग्रस्तांकडे गुणवत्ता असतानाही घेतले जात नाही, असा आरोप या प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. वारंवार पत्र व्यवहार करून आणि मागणी करूनही सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथला भूमिहीन प्रकल्पग्रस्त करत आहे. यासह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 25 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या आंदोलनात मेट्रो कारशेडचे काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सिडको आणि महामेट्रोचे म्हणणे काय?

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि आरोपांसंदर्भात आमच्या प्रतिनिधीने जेव्हा सिडकोकडे विचारणा केली तेव्हा माहिती घेऊन सांगतो असे सरकारी उत्तर मिळाले. तर महामेट्रोचे कार्यकारी संचालक नामदेव रबडे यांनी फोनवरुन प्रतिक्रिया दिली, पण नोकर भरती सिडकोतर्फे केली जाती याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे सांगितले.

Updated : 24 Aug 2021 7:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top