Home > News Update > राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाचे उद्घाटन

राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाचे उद्घाटन

राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाचे उद्घाटन
X

औरंगाबाद : अखिल भारतीय किसान मजदूर संघ आणि अखिल भारतीय दलित अधिकार मंचातर्फे आयोजित दोन दिवसांच्या राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशनाला रविवारी सुरूवात झाली. शहरातील पैठणगेट परिसरातील बुद्ध प्रिया कबीर नगरी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन दिवसांचे हे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाचे उदघाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव आणि माजी खासदार डी. राजा यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला आहे.

आंबेडकर वाद आणि मार्क्सवादाचे ध्येय एकच आहे, त्यामुळे दोन्ही विचारधारा एकत्र आल्या तरच आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सारख्या जातीवादी शक्तींचा मुकाबला करता येईल, असे मत डी राजा यांनी व्यक्त केले. मोदी सरकार हे दलितांवर अत्याचार करत आहे व लोकशाही संविधान नैतिक मूल्यांना मानत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्सच्या अनुयायांनी आता एकाच मंचावर येण्याची गरज आहे. आपण एकत्र येऊन लढलो पाहिजे ,भारत सध्या बदलाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. आरएसएसची ताकद निर्माण झाली आहे त्यांनी, देशात वसाहतवाद आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा मुकाबला करण्याची सगळ्यांनी एकत्र येण्याचा आवाहन डी राजा यांनी केले.

Updated : 19 Dec 2021 4:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top