ट्विटरवर नथुरामच्या समर्थनार्थ ट्वीट करणाऱ्यांना ब्लॉक करा: यशोमती ठाकूर यांची ट्विटरकडे मागणी
X
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज सगळीकडे साजरी होत असताना देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ काही लोक ट्विटर वर #नाथूरामगोडसेजिंदाबाद हा ट्रेंड चालवत आहेत. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी या संदर्भात ट्वीट केलं असून ट्वीटर कडे या आशयाचे ट्वीट करणाऱ्या लोकांना ब्लॉक करण्याची मागणी ट्वीटकडे केली आहे.
आजच्या दिवशी देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ @TwitterIndia @Twitter वर चालवण्यात आलेले ट्रेंड ब्लॉक करावेत व ट्रेंड मध्ये सामील झालेल्यांचे अकाऊंट बंद करण्यात यावेत अशी माझी ट्वीटर कडे मागणी आहे.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) October 2, 2021
पंतप्रधान जेव्हा देशाबाहेर जातात. तेव्हा ते महात्मा गांधी यांच्या विचाराबाबत बोलत असतात. मात्र, देशातील काही आयटीतील लोक नथुराम समर्थनात ट्रेड चालू करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा सगळ्यांच्या अकाउंट ब्लॉक करावेत अशी मी पुन्हा मागणी करते. असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.