Home > News Update > नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला
X

आज दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत एनडीए च्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली. या मध्ये एनडीए च्या घटक पक्षांचे प्रमूख नेते देखील उपस्थित होते. सत्ता स्थापने साठी लागणाऱ्या २७२ खासदारांचा बहुमताचा आकडा हा एनडीए कडे आसल्याचे स्पष्ट झाले. या वेळी एनडीए च्या नवनिर्वाचित खासदारांनी आपले समर्थन पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच असल्याचे स्पष्ट केले. या मुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होनार हे स्पष्ट झाले आहे.

सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ खासदारांचे समर्थन पत्र घेऊन. नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी लवकरच जाणारा असून, येत्या नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ चा निकाल चार जून रोजी जाहिर झाला. या नंतर नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार की इतर कोणी पंतप्रधान होणार. या चर्चांना उधाण आले होते. याचं कारण भाजपला न मिळालेलं पुर्ण बहुमत. मात्र भाजप सोबत एनडीए मध्ये आसणाऱ्या इतर घटक पक्ष यांचं मिळून एकत्रीत संख्याबळ हे २७२ या बहुमताच्या संखे पेक्षा जास्त असल्याने पंतप्रधान एनडीए चाच हिनार हे स्पष्ट झालं आहे. या मुळे नरेंद्र मोदी या देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असून नऊ जून सायंकाळी सहा वाजता मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी पार पडेल.

Updated : 7 Jun 2024 3:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top