Home > News Update > नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

देशात दाबावाचं राजकारण सुरू आहे, दमबाजीचे राजकारण सुरू आहे, ब्लैकमेलिंगचे राजकारण सुरू आहे, कशासाठी? तर मार्च - एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत म्हणून हे सगळं चाललं आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीआरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनाही खुले आव्हान !

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर
X

Nagpur : पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा हे आधी स्पष्ट करा, जागांच्या वाटपावरून जर अडून बसाल तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. असा घणाघात हल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आयोजित कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की "आरएसएसवाल्यांना हिंदूंना एकत्रित करण्याचा एक कार्यक्रम देतो तो म्हणजे, एक हिंदू धर्मशास्त्राचे विद्यापीठ उभ करायचं जे धर्माशिवाय दुसरं काय करणार नाही. आणि एक कायदा करायचा की, हिंदू पुजारी हा त्या विद्यापीठातील पदवीधर असायला हवा. तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. हा माझा सल्ला आहे. हा मान्य केला तर मी तुम्हाला हात देईल असे आव्हान त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना केले आहे. पूर्वी सत्तेचे केंद्र हे धर्म असायचे, आता सत्ता केंद्र हे संसद आहे. संसदेवर ज्याचा ताबा असतो त्यांचीच व्यवस्था असते, म्हणून आपल्याला आपली व्यवस्था कायम ठेवायची असेल तर संसद आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे" असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

ते पुढे म्हणाले की "मनुस्मृतीची व्यवस्था ही अधिकार हिसाकावून घेणारी व्यवस्था आहे. समता प्रस्थापित न करणारी व्यवस्था आहे, व्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारी व्यवस्था आहे, न्याय न देणारी आहे. म्हणून आपण संविधान निर्मित व्यवस्था आपण पुरस्कृत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजामध्ये एकोपा पाहिजे की, विभक्तपणा पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. गुलामी आणि विषमता पाहिजे असेल तर विभक्त पणाचा आधार घ्यावा लागतो. यातून आपण द्वेष करायला सुरुवात करतो. आपली क्रांती ही मानवतावादासाठी आहे. त्यासाठी इथल्या मानवांना एकत्रित करणे हे आपले कार्य आहे. हा लढा विषमते विरुध्द एकता प्रस्थापित करण्यासाठी आहे. वर्चस्व नावाची संकल्पना ही विभक्तवादी विचारांतचं जन्माला येते आणि टिकते. संघटित राहण्याच्या विचारांत वर्चस्व वादाला जागाचं नसते,असे त्यांनी म्हटले आहे.

दाबावाचं राजकारण सुरू आहे, दमबाजीचे राजकारण सुरू आहे, ब्लैकमेलिंगचे राजकारण सुरू आहे, कशासाठी? तर मार्च - एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुका या प्रतिक्रांतीवाद्यांना जिंकायच्या आहेत म्हणून हे सगळं चाललं आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 26 Dec 2023 9:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top