Home > News Update > हटाओ लुंगी, बजाओ पुंगी ते तेलंगणा शिवसेना भाऊ भाऊ हे अजब परिवर्तन, नारायण राणेंचा टोला

हटाओ लुंगी, बजाओ पुंगी ते तेलंगणा शिवसेना भाऊ भाऊ हे अजब परिवर्तन, नारायण राणेंचा टोला

शिवसेनेने दक्षिण भारतीयांच्या विरोधात हटाओ लुंगी बजाओ पुंगी अशी घोषणा दिली होती. मात्र आता शिवसेनेची भुमिका बदलल्याने नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

हटाओ लुंगी, बजाओ पुंगी ते तेलंगणा शिवसेना भाऊ भाऊ हे अजब परिवर्तन, नारायण राणेंचा टोला
X

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी वाद रंगला आहे. तर दररोजच्या पत्रकार परिषदांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली आहे. तर शिवसेनेच्या हटाओ लुंगी बजाओ पुंगी या घोषणेची आठवण करून दिली आहे.

नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तरी त्याचा समुद्र होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पुर्वी एक घोषणा देत होती. हटाओ लुंगी, बजाओ पुंगी. पण आता शिवसेना आणि तेलंगणा भाऊ भाऊ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे अजब परिवर्तन असल्याचा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

तेलंगणा आणि शिवसेना भाऊ भाऊ मिळेल ते मिळून खाऊ, अशी शिवसेना आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भुमिका असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीवरून लगावला.

पुढे राणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही, आणि तेलंगणा म्हणजे भारत नाही. भाजपचे केंद्रात सरकार असून सरकारकडे 301 खासदारांचे बहुमत आहे, अशा शब्दात शिवसेना आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या तिसऱ्या आघाडीच्या वक्तव्यावर टीका केली.

दोन दिवसांपुर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. तर या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत तिसऱ्या आघाडीवर चर्चा झाल्याचे म्हटले. त्यावरून नारायण राणे यांनी शिवसेनेला त्यांच्या जुन्या घोषणेची आठवण करून दिली आहे.

Updated : 22 Feb 2022 9:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top