Home > News Update > 'भारत बंद' ला नंदुरबार प्रहार शेतकरी संघटनेचा पाठिंबा

'भारत बंद' ला नंदुरबार प्रहार शेतकरी संघटनेचा पाठिंबा

भारत बंद ला नंदुरबार प्रहार शेतकरी संघटनेचा पाठिंबा
X

नंदुरबार : प्रहार शेतकरी संघटनेतर्फे आज कृषी कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले व शेतकरी कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात येत होती, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना होळी करण्यापासून थांबवण्यात आले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी बोलताना आंदोलक म्हणाले की, शेतकरी , शेतमजूर कामगार यांच्या शोषणावर जिवंत असलेली भारतीय लोकशाही जगात सर्वोत्तम कशी आहे ,हा प्रश्न आज देशातील प्रत्येक शेतकरी , कामगार , सामान्य जनता भारत बंदच्या माध्यमातून आपणास विचारत आहे. २८० दिवसांपासून आम्ही न मागितलेले कृषी कायदे तूम्ही व तूमच्या सहकाऱ्यांनी लादले ते तूम्ही परत घ्यावे. शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती , दिडपट हमी भावाचे दिलेले वचन तुम्ही पाळले नाही . तसेच २०१४ ला आपण मोठे स्वप्न जनतेतील प्रत्येक सामान्य माणसापासून विद्यार्थी , बेरोजगार , शेतकरी यांना दाखवले ते तर पूर्ण झालेच नाही त्याच्या उलट बेरोजगारी , शेतकरी आत्महत्या , गॅस , पेट्रोल , डीझेल व इतर जीवनाश्यक वस्तुंचे भाव आज गगनाला भिडले आहेत. या विरोधात आम्ही सर्व भारत बंदमध्ये सामील होत आहोत. २०१४ च्या आपण दिलेल्या आपल्या वचन नाम्यावर आपण चिंतन करुन पेट्रोल , डिझेल , गॅस दरवाढ मागे घ्यावी. कामगार विरोधी कायदे , नवीन आणत असलेले विज विधेयक मागे घ्यावे , महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत मजुरांचे दिवस व मजूरीत वाढ करावी. अन्यथा केंद्र सरकारला गंभीर परीणाम भोगावे लागतील असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपिन पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 27 Sept 2021 3:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top