नांदेड: मनोज जरांगेंच्या भेटीला नांदेड जिल्ह्यातील तब्बल एक हजार नऊशे ग्रामपंचायतीचे शिष्ट मंडळ रवाना
X
Nanded : नांदेडात सकल मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकांची धामधूम, मराठा समाजाचे शिस्टमंडळ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे शिस्ट मंडळ आज अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाले आहे. मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जिल्ह्यांतील तब्बल एक हजार नऊशे ग्रामपंचायतीचे शिष्ट मंडळ आज अंतरवालीच्या दिशेने रवाना झालय. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी व उमेदवार निश्चित करण्यासाठी या शिष्ट मंडळाने अंतरवालीकडे कूच केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांत जिल्ह्यातून सकल मराठा समाजाकडून प्रत्येक गावातून दहा उमेदवार देण्याचं निश्चित झालं आहे.त्या प्रमाणे अर्धापूर तालुक्यातील 47 गावांनी ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेऊन उमेदवार निश्चित केले आहेत. त्यानुसार गावांनी चंदा जमा करून निवडणूक खर्च करण्याचीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यांतील प्रत्येक गावातून ग्राम पंचायत ठराव घेऊन जवळपास दीडशे लोकांचे सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षांना हादरा देण्यासाठी आता सकल मराठा समाजाने कंबर कसल्याचं चित्र आहे.