Home > News Update > नाना पाटेकरने फॅन्स मारली चापट; व्हिडीओ होतोय व्हायरलं

नाना पाटेकरने फॅन्स मारली चापट; व्हिडीओ होतोय व्हायरलं

नाना पाटेकरने फॅन्स मारली चापट; व्हिडीओ होतोय व्हायरलं
X

अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयामुळे नाना पाटेकरांचा चाहता वर्ग हा संपूर्ण देशभर आहे. प्रत्येक वेळी अँग्री यंग मॅन चा अभिनय करणारे नाना प्रत्येक्षात त्या कॅरेक्टमध्ये दिसले. हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरलं होत असल्याने अनेक जण यावर प्रकारामुळे नाना पाटेकरांना ट्रोल करत आहेत.

नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नाना पाटेकर यांनी वाराणसीमध्ये शूटिंगदरम्यान रागाच्या भरात एका चाहात्याच्या डोक्यावर मारल्याचं या व्हिडीओत दिसून आलं. या व्हिडिओनंतर नाना पाटेकर यांना खूप ट्रोल केले जात आहे. अशा परिस्थितीत, आझाद अधिकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ ठाकूर (Amitab Thakur) यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात वाराणसीमध्ये १४ नोव्हेंबर २०२३ रोजी एका चाहत्याला थप्पड मारून आणि क्रूरपणे गळा दाबल्याप्रकरणी तक्रार दाखल करत एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी होत आहे.

Updated : 15 Nov 2023 7:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top